
0
5
3
6
2
3
पैठणी
पैठणीची घडी चंदनाची वडी…!
एक-एक घडी उकलता गंध
जुना-पुराणा.. मोहुन जाई..!
संदुकाच्या कप्प्यामंधी पैठणी
ठेवली होती… रंग गुलाबी…!
पदर हिरवा… नकीला स्वर्ण तारा
हजार बुटी… ठासून चमकत होती
किती श्रवणाची …सोहळे-वोवळे
ती नेसूनच… पूजा-पाठ केलेली होती
गौरी-पुजेला… तीलाच मान गुढीला दिसे छान
संक्रातीच ववसा आवसा
दुख-सुखाचा थेंब तीला स्पर्श झाला
कदी-पदी नेसली… ती पैठणी…!
मोल तुला कुठ… माहीत बाई
तुला पैठणी आशी… खुलायची
मला तू… परी दिसायची…!
कल्पवृक्षा छाया खाली
मग कशाची कमी नसायची
पैठणी च्या गंधाचा सुगंध अजून
तसाच आहे…!
तू जशी जपली पैठणी… मला कला
का तू शिकवली नाही;सांग बर आई
तुला पैठणी सम;जपले असते
मग डोळ्यात आश्रूं आले नसते
जपेल पैठणी;खोल मनात जागा,
पैठणीला अश्रूंची सुमने वाहुनी
बार-बार घडी उकलून पाहे मिच बाई
नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि. परभणी
0
5
3
6
2
3



