
0
6
1
3
9
9
पावसाची वाट
वेड्यापरी पाहतो मी त्या पावसाची वाट !
तहानले जीव सारे माळरान डोंगर घाट !!१!!
व्याकूळ वृक्षवल्ली चिमणी पाखरे नि माती !
प्राण मुठीत धरूनी,बघती नभाच्या हाती!!२!!
उन्हातान्हात ज्याने पेरणी केली शेताची !
पणाला लावली आज ,जिंदगानी बेताची !!३!!
उरामध्ये स्वप्ने घेऊनी ढाळला ज्याने घाम !
फाटले धोतर शिवाया मिळेल नक्की दाम !!४!!
असे कसे हे आभाळ फसविते मला तुला !
बरसून जा आता विनवणी निळ्या नभाला !!५!!
ऋतू आजकाल ईथे गुपिते सांगत नाही !
अजाणता तुझा माझा प्राण घेऊन जाई !!६!!
तरी सृष्टीशी जगी जुळला न्यारा जिव्हाळा !
ऋतू बदलती जरी, सोबतीला हा उन्हाळा!!७!!
माणसाने या जगात जगावे कसे जीवन ?
पाषाण पुजुनी कधी फुलले का नंदनवन ?!!८!!
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ
=========
0
6
1
3
9
9



