0
4
8
2
8
6
पोपट मामा
पोपट मामा पोपट मामा
काय काय खाणार
पेरूची फोड खाऊन तुम्ही
गोड गोड सगळ्यांशी बोलणार
पोपट मामा पोपट मामा
काय काय खाणार
लाल लाल डाळिंब खाऊन
आकाशी भरारी घेणार
पोपट मामा पोपट मामा
आता काय खाणार
आणल्या हिरव्या मिरच्या
खाऊन सगळ्या टाकणार
पोपट मामा पोपट मामा
आता काय हवे आपणाला
सांगा पटपट सारे आता
जाऊन येते बाजाराला
पोपट मामा पोपट मामा
खाऊन घ्या आता सगळे
ऐकायला गोड बोल तुमचे
गोळा झाले पक्षी सगळे
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
==========
0
4
8
2
8
6



