बारा वर्ष
शितल शर्मा नाईक
बारा वर्ष….
मी शितल अभिषेक शर्मा. लग्नापूर्वीची शितल वैभव नाईक. माझ्या लेखाचे टायटल असे का असे वाटत असेल तर तुम्हाला! याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बारा वर्षात माझं सगळं जग सामावलेला आहे.
माझ्या लग्नाला 12/02/2025 या तारखेला बारा वर्षे पूर्ण होतील. पण हे बारा व वर्ष साजरा करण्यासाठी माझा नवरा माझ्याबरोबर नाही.10/12/2024 रोजी माझ्या नवऱ्याला देवाज्ञा झाली. माझ्यासाठी अतिशय दुःखद गोष्ट आहे ही.
माझं लव मॅरेज होतं.2007 पासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ओळखीचे रूपांतर कधी प्रेमात झाले समजले नाही. मग काय दोन्ही फॅमिलीच्या संमतीने आमचं लग्न 12/02/2012 बाराला झाले.
आम्ही खूप खुश होतो असे म्हणण्यापेक्षा मी जास्त खुश होते असं मी म्हणेन.
आमचा संसार चालू झाला.आमच्या दोन्ही घरचे तसे रीती रिवाज खूप वेगळे होते. चालीरिती वेगळ्या होत्या. परंपरा वेगळी होती. तरीही सर्वच आले होते मी शिकून घेतले आणि हा सतत पार पाडत होते. कारण माझं प्रेम त्याच्यावर होतं. सगळं पार पाडात गेले. माझ्या नवऱ्याने देखील इथे मला खूप साथ दिली.
24/12/2012 ला आम्हाला मुलगा झाला. आम्ही दोघं खूप खुश होतो असाच माझा संसार पुढे छान चालत होता थोडा चर-उतार चालूच होता. सांगेन पुढे अजून मी माझा एक पुस्तक काढणार आहे त्या वेळेला. सविस्तर मांडणी करणार आहे.
नंतर आम्हाला 10 जानेवारी 2021 ला दुसरा मुलगा झाला. जणू काय आमचं विश्वपूर्ण झालं. आम्ही आमच्या छोट्या दुनियेत खूप खुश होतो.
आमच्या संसाराचा चौकोन पूर्ण झाला होता. म्हणतात ना सुख जास्त दिवस टिकत नाही किंवा सुखाची कोणाची तरी नजर लागते तसेच माझ्याही बाबतीत झाले. माझ्या संसाराला अशी नजर लागली की, माझं जीवन म्हणणारा सगळं काही होता माझा नवरा,तोच या जगात राहिला नाही. त्याला जाऊन आता नुकतेच काही दिवस झालेले आहेत.
त्याच्या घरच्यांनी मला व माझ्या मुलांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. आपण म्हणतो ना की एका स्त्रीला समाजात इज्जत तेव्हाच मिळते तेव्हा तिचा पती तिच्याबरोबर असतो. पण जाऊ दे. माझी कोणाकडेच कसलीही तक्रार नाही. त्याच्या घरच्यांच्या टोमण्यांना मी वैतागले होते. त्यांच्याबरोबर राहणं मला कठीण जाऊ लागलं. म्हणून मी माझं सगळं तिथे सोडलं आणि माझ्या माहेरी आईकडे निघून आले.
पण मला एक सांगा हीच का आपली संस्कृती! आपण भारतात कुठेही राहिलो तरी माणसाने आपले संस्कार, संस्कृती विसरता कामा नयेत. मी हे सगळं का सांगतेय तर त्याचे कारण असा आहे की अभिषेकच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की तो तुझा फक्त नवराच नव्हता व आमचा मुलगा कोणाचा भाऊ होता तुझ्यापेक्षा तो आमच्या सोबत खूप वर्ष राहिला होता. तू तर फक्त बाराच वर्ष होतीस त्याच्याबरोबर. असे सर्व खूप काही बोलायचे.
मला हे सगळं मान्य आहे तो त्यांचा मुलगा होता कोणाचा भाऊ होता अरे पण त्यांना हे कळत नाही की तो मला नवरा होता दोन मुलांचा वडील होता. नवरा म्हणजे काय हे एका स्त्रीसाठी सगळं काही असतं. हे यांना का समजत नव्हतं. नवरा म्हणजे सखा असतो नवरा म्हणजे मित्र असतो नवरा म्हणजे सर्व काही असतो खूप काही सांगता येईल याच्याबद्दल.
माझ्या जीवनातील फक्त बारा वर्ष नसून त्या बारा वर्षात तिने आपल्या नवऱ्याबरोबर घालवलेले खूप छान क्षण असतात. रुसवे,फुगवे, भांडण, प्रेम आपल्या मुलांसोबत घालवलेले ते गोड क्षण वडीलांचा धाक, ते प्रेम,तो प्रेमाचा घास, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या सवयी, त्याचं बोलणं, हसणं, चालणं,रागावणं खूप काही सांगण्यासारखं असतं हो! त्या बारा वर्षांमध्ये,तरीही कसे म्हणतात म्हणणारे फक्त बाराच वर्ष! पण माझ्यासाठी एक तप होतं.
बारा वर्ष म्हणजे बघा हं..
1 वर्ष – 12 महिने
12 महिने – 365 दिवस
1 महिना -30/31 दिवस
1 महिना – 4 आठवडे
1 आठवडा – 7 दिवस
1 दिवस – 24 तास
1 तास – 60 मिनिटे
1 मिनिट – 60 सेकंद
आता बघा बरं तुम्ही वेळेचा हिशोब लावून. मी म्हणत नाही की मी माझ्या ह्या बारा वर्षात सर्व आयुष्य जगले, आयुष्य माझं सुंदर होतच त्याच्याबरोबर आणि त्याच्या नंतरही कारण मला माझी पुढे दोन मुलांसाठी जगायचं आहे. मला त्यांची आई आणि वडिलांचा दोन्ही रोल करायचा आहे. त्यांचे फ्युचर मला ब्राईट करायचे आहे. आता जगायचे त्यांच्यासाठी जगायचं.
ही जीवनातील बारा वर्षांमध्ये माझ्या जीवनातला सुवर्णकाळ होता. ही बारा वर्षे मी आयुष्यात विसरू शकत नाही. शकणारही नाही. आणि त्याची साथ माझ्याबरोबर कायम असणार आहे. माझी साथ अशी सहजासहजी सोडणार नाही. आफ्टर ऑल आम्ही बारा वर्षे एकत्र काढले आहेत.
आले या जीवनी
आई-वडिलांच्यामुळे
पत्नी झाले अभिषेकची
स्त्रीत्व मिळाले मुलांमुळे…..
शितल अभिषेक शर्मा /नाईक
मो. नं. 9823582116



