Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगसाहित्यगंध

फाल्गुनातील चैत्रविलास

वृंदा (चित्रा) करमरकर सांगली जिल्हा सांगली

0 5 1 6 4 1

फाल्गुनातील चैत्रविलास

निसर्गात ऋतूंचा रंगलेला बहारदार खेळ पाहिला की, अचंबित व्हायला होतं. तसेच बाराही महिने एकामेकात एखादा गोफ विणावा तसे ते अलगद एकत्र गुंफलेले असतात. एक महिना या निसर्गातून आपला निरोप घेण्यापूर्वीच नवीन महिन्याला आमंत्रित करतो. खुलेआम त्याचे स्वागत करतो. तसाच फाल्गुनही याला अपवाद कसा असेल? या महिन्यात उन्हाळ्याची तलखी असतेच; पण मधूनच वाऱ्याच्या सुखदशा लहरी स्पर्शतात आणि मनाला फाल्गुनातील आनंद देतात. या महिन्यात सृष्टीला प्रणयाची बाधा झालेली असते. पक्षीवर्गात ही प्रणयातूरता जाणवते.

पक्ष्यांच्या स्वरातील माधुर्य अधिकच गहिरे होते. त्यांचे स्वर अधिक मंजूळ होतात. चिमण्या, कावळे, साळुंख्या अशा सर्व पक्ष्यांच्या सूरांत ही मधुरता असते. एक उत्कटता साऱ्या निसर्गात असते. मधूनच मृगजळांचे भास होतात. प्रणयार्त पक्षीही किती संयमी असतात. हा गुण घेण्यासारखा आहे मानवाने. ‘शांत दुपार हे फाल्गुनाचे आणि एक वैशिष्ट्य आहे’. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात. बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असतो. पण बाहेर पक्ष्यांच्या मधुरवाने मनात आनंद निर्मिती होते. उन्हाचा ताव, मनी आठव पिंगा आणि पक्ष्यांचा मधुरव अशी ही सरमिसळ या फाल्गुनात दुपारी असते.

फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान निसर्गातील ‘रंगपंचमी’ अगदी भराला आलेली असते. पळस तर फुलून लालकेशरी साज लेवून नटलेला आहे. त्यात मोहरीच्या फुलांचा गर्दपिवळा रंग, झाडावेलींवरील पालवीच्या अनेकविध छटा हा रंगोत्सवच ना? म्हणूनच श्रीहरी गोपगोपींसह, राधेसह होलिकोत्सव साजरा करून रंगांमध्ये न्हाऊन निघत असेल. साऱ्या जगताला समानतेची शिकवण अशाच कृतीतून भगवंत देत असतो. अथांग प्रेम देणारा हा फाल्गुन मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक विरह असा दुर्मिळ संगम फाल्गुन मासात असतो.

वातावरणात तरुवेलींची सुकलेली पाने गळतात. पानगळ हाच शिशिराचा स्थायीभाव असतो. पण फाल्गुनातच साऱ्या वृक्ष वेलींवर नाजूक पालवी फुटू लागते. असं वाटतं कि फाल्गुन मास आतुरतेने आपल्या चैत्र सख्याची वाट पहात असतो. उन्हाने भाजणाऱ्या झाडा-वेलींना मायेने कुरवाळत हा हसरा फाल्गुन नवपालवीची शुभवार्ता सांगत असतो. फाल्गुन सख्याच्या अंतरीची हाक चैत्रसख्याला ऐकू येते. मग अलगद निसर्गात, इथे तिथे पानोपानी चैत्राच्या चाहूल खुणा खुणा%B

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे