0
4
8
2
9
0
होकार देऊन पहा
मनी दाटल्या भावनांना
ओसंडून वाहू दे
काळजातल्या वेदनांना
शब्दांतून वाट दे ॥
दे फेकून मनावरचे
मळभ ते नैराश्येचे
डोळे उघडून पहा एकदा
दिसेल किरण आशेचे ॥
धगधगत्या वणव्यातही
तावून सुलाखून निघशील तू
जीवन हे सुंदर आहे
पुन्हा एकदा बघशील तू ॥
दे फेकून अपेक्षांचे
ओझे ते मनावरचे
आहे तसे समोरच्याला
मनापासून स्विकारायचे ॥
संकटांच्या वादळातही
खंबीर उभा रहा
जीवनाला पुन्हा एकदा
होकार देऊन पहा ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
8
2
9
0



