बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघाचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघाचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे, दि.25 सप्टें.(प्रतिनिधी) बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन नुकतेच पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन मॉडर्न काॅलेजच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते.
या सोहळ्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, सहकार व नागरी उड्डयन- भारत सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस,ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस वसंत पिंपळापुरे,अध्यक्ष मोहन घोळवे, एस यू देशपांडे, कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर, मोहन शनवारे,
नारायण अचलेरकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्रीमहोदय मा. मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राष्ट्रीयकृत बँकेतील निवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले आणि निवृत्त कर्मचारी संघटनेच्या विविध प्रकल्पांची प्रशंसा केली. त्यापैकी निवृत्त कर्मचा-यांनी स्वतःच्या पेन्शनमधून जमा केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून आजपर्यंत विविध गरजू संस्थांना दोन कोटी रुपये इतकी आर्थिक मदत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी निवृत्त कर्मचा-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या अधिवेशनात संपूर्ण देशभरातून आठशे बँकांचे निवृत्त कर्मचारी सभासद उपस्थित होते.





