जे. एस. एम. कॉलेजमध्ये रोजगार मेळावा संपन्न
जे. एस. एम. कॉलेजमध्ये रोजगार मेळावा संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: जे एस एम महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने दिनांक २६/०९/२०२४ रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अलिबाग आणि IQAC-जे.एस.एम. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांच्या सौजन्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड गौतम पाटील यांनी रोजगार मेळाव्या करिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर प्राचार्या डॉ सोनाली पाटील यांनी अधिकाधिक संख्येने विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असिस्टंट अप्रेंटीसशीप ॲडव्हायझर श्री मारीदास पिल्लाई, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर श्री अमोल चव्हाण, जू. अप्रेंटिसशिप ॲडव्हायझर सौ सुप्रिया ठाकूर, आयटीआय प्रिन्सिपल श्री कैलास शेगर, लिपिक श्री महेश वखरे, सौ सिद्धी गोलपकर यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या रोजगार संबंधित विविध योजनांची माहिती दिली.
या मेळाव्यामध्ये एकूण १० नामांकित संस्था सहभागी झाल्या होत्या व त्यात एकूण १६६ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. प्रा.प्रशांत चाटे, प्रा. जयश्री पाटील तसेच प्लेसमेंट सेल व माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व समिती सदस्यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्वेता पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.संतोष हाके यांनी केले. सदर मेळाव्यात अनेक नामांकित आस्थापनांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाकडून मेळाव्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.



