Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

स्वप्नविरह

स्वाती मराडे-आटोळे ता.इंदापूर, जि.पुणे

0 5 9 4 1 4

स्वप्नविरह

नेहमीच आता मी हसू गालावर ठेवतो
हसत हसत मागे दु:ख विरहाचं लपवतो..
तुझ्या आठवणीत मन करते आकांत
सोसवत नाही तेव्हा मी गाठतो एकांत

क्षणही वाटे युगासारखा सरकत नाही पुढे
कळत नाही कसे सोडवू विरहाचे कोडे..
चंद्र नभीचा पाहून लाट उधाणते अंतरी
येते भरती सागराला पापण्यांच्या किनारी..

दिस सरेल कधी वाट पाहतो निशेची
स्वप्नात तरी भेटशील, या वेड्या आशेची
करतो निद्रेची आराधना जरी ती येत नाही
चांदण्यांनी भरूनही, आकाश माझं रितंच राही

गंधाळलेल्या पहाटवेळी मिटती हे नयन
येऊन स्वप्नात अशी तू, उधळतेस चांदणं..
सरतो स्वप्नविरह, डोळे भरून तुज पाहून
दु:खाचं काजळ मग क्षणात जातं वाहून..!

स्वाती मराडे-आटोळे
ता.इंदापूर, जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे