Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखबीडमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

थंडीतील उब अन् सामाजिक एकत्रीकरणाचे स्त्रोत ‘शेकोटी’: शर्मिला देशमुख

मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 0 9 0 3

थंडीतील उब अन् सामाजिक एकत्रीकरणाचे स्त्रोत ‘शेकोटी’: शर्मिला देशमुख

मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“अंगात भरता हुडहुडी, पेटते शेकोटी अंगणात,
ती मायेची उब मिळवण्या, जागे लालसा मनामनात…”

तसे पाहिले तर शेकोटीचा इतिहास हा मानवी उत्क्रांतीशी जोडला गेलेला आहे. प्राचीन काळी अश्मयुगीन मानवाने अग्नीचा वापर उब मिळवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी केला. सुरुवातीला नैसर्गिकरित्या पेटलेल्या आगीने म्हणजेच वनव्याने मानवाला आगीचा उपयोग समजला. अंधारावर विजय मिळवण्यासाठी म्हणजेच अंधार दूर करण्यासाठी तसेच कडकडीत थंडीत उब मिळवण्यासाठी शेकोटी पेटवली जाते. अंगणात शेकोटी पेटली म्हणजे हळूहळू सर्व मंडळी जमा होऊ लागते. अबाल वृद्धांपासून सर्वजण जमा होऊन सामाजिक एकत्रीकरण होण्यास मदत होते. शेकोटी भोवती सर्वजण एकत्र जमतात त्यामुळे सामाजिक संबंध, सलोखा निर्माण होऊन कुटुंबांनाही एकत्र येण्याची संधी मिळते.

शेकोटीचे स्वरूप काळानुसार बदलत गेले आहे आणि ती आज केवळ उब मिळवण्यासाठीच नाही, तर विविध सण आणि समारंभाचा भाग बनली आहे. होळी सारखे सण तसेच आदिवासी संस्कृती परंपरा पाहिली तर ती शेकोटीभोवती फिरताना आढळते. शेकोटीचा वापर धार्मिक आणि सांस्कृतिक विधींसाठी केला जातो. अनेक ठिकाणी कॅम्पिंग आणि ट्रेकिंग सारख्या कार्यक्रमांमध्ये शेकोटीचा वापर केला जातो. स्काऊट गाईड चळवळींमध्ये शेकोटी गीत आणि शेकोटी भोवती एकत्र येणे हे महत्त्वाचे उपक्रम घेतले जातात. काही सण समारंभांमध्ये शेकोटीची जागा आधुनिक उपकरणांनी घेतली असली तरीही शेकोटीचे पारंपारिक महत्त्व कायम आहे.

अशा प्रकारची ही उबदार शेकोटी आगटी, विस्तव, जाळ अशा विविध नावांनी ओळखली जात असली तरी तिची उब मात्र काही औरच असते. शहरीकरणामुळे शेकोटी कालबाह्य ठरत असली, तरी आजही ग्रामीण भागात ही उब मिळवताना ग्रामस्थ ठिकठिकाणी आढळतात. अशी ही मायेची शेकोटी ‘मराठीचे शिलदार’ समूहात अवतरली आणि बालकवितांची उब सगळीकडे पसरली. सर्वांनी आपापले बालपणीचे अनुभव चित्रित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सर्व बालकवींना पुढील लेखनासाठी भरभरून शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार. चला तर मग जाऊया थंडीत शेकोटीची उब घ्यायला. तूर्तास थांबते ..धन्यवाद !!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/ कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे