देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांची घोषणा
सम्राट फडणीस, प्रसाद पानसे, सूरज खटावकर, प्रशांत दांडेकर,रसिका कुलकर्णी यांची नावे घोषित
देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांची घोषणा
सम्राट फडणीस, प्रसाद पानसे, सूरज खटावकर, प्रशांत दांडेकर,रसिका कुलकर्णी यांची नावे घोषित
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे – १७ऑ(प्रतिनिधी) गेली 13 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांनी एक स्थान निर्माण केले असून प्रतिष्ठीत समजल्या जाणा-या या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली.
“ज्येष्ठ पत्रकार” प्रकारात २१ हजार रुपये रोख, व अन्य तीन माध्यम प्रकारात ११ हजार रुपये रोख , सोबत देवर्षी नारद मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस आणि पुणे महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे हे “ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारा” चे मानकरी ठरले आहेत. तसेच,’मराठी किडा’ या सोशल मीडिया पेजचे सूरज खटावकर व प्रशांत दांडेकर, आणि कोल्हापूर येथील टोमॅटो एफ.एम.च्या रसिका कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व डेक्कन एज्यु. परिषद नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परीषदेस संबोधित केले. गुरूवार दि. 22 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा सकाळी साडेदहा वाजता फर्ग्युसन काॅलेजच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, यावेळी ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर सुनील आंबेकर यांचे व्याख्यान होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येईल.
यावेळी आनंद काटीकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध माध्यमांच्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या शिक्षणाच्या संधी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त डीईएस पुणे विद्यापीठ याविषयी माहिती दिली. त्यात माध्यम क्षेत्रात आता सर्व प्रिंट, इलेक्ट्रोनिक मीडियासाठी आवश्यक फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर यासारखे विविध प्रकारचे शिक्षण अनेक विद्यार्थी घेत आहेत अशी माहिती देऊन या समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.