कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार व खून प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची निदर्शने
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार व खून प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची निदर्शने
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
नागपूर: कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टर बलात्कार व खून प्रकरणी आज नागपूर येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्त डॉक्टरांनी आज निदर्शन करून कोलकत्यातील घडलेल्या घटनेचा निषेध केला. तसेच ‘देश तो आजाद है देश की बेटी कब आझाद होगी, असे फलक दाखवून. आधी सुरक्षा मग ड्यूटी अश्या घोषणा देत संताप व्यक्त केला.
दि.17 ऑगस्ट सकाळी सहा ते 18 ऑगस्ट सकाळी सहा असे 24 तास रुग्णालय बंद ठेवण्याचे आवाहन केले. कोलकाता येथील कार वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थिनी वरील बलात्कार व खुनाच्या घटनेने देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. ज्या महाविद्यालयात ही घटना घडली तेथे 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी आंदोलन विद्यार्थ्यांवर हजारोच्या संख्येने हल्ला करून हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली होती. त्यामुळे संतापात आणखी भर पडली.
नागपूरातील सर्व डॉक्टर आकस्मिक सेवा वगळता सर्व सेवा 24 तास बंद ठेवणार आहेत डॉक्टरने संप पुकारल्यामुळे सरकारी रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाली आहे शिवाय खाजगी रुग्णालय सुद्धा 24 तास बंद ठेवणार आहेत त्यामुळे रुग्णांची फार मोठी गैरसोय होणार आहे.





