
0
4
0
9
0
1
तुझी आठवण येता
तुझी आठवण येता
मन कासावीस होते
भेटायला ये ना मला
दुनिया सुनी भासते
इतिहासाची पाने चाळताना
गतस्मृती डोळ्यात तरंगतात
हृदयाच्या खोलकप्प्यात बसतात
आठवणीने पुन्हा वर येतात
गोड कडू सुखदुःखाची
आठवणी येतात भरून
जीव लावी ती साऱ्या जणी
मनाची मरगळ नाहीशी करून
आठवणीच्या वहीत आजवर
रोजनिशी ठेवली लिहून
मोरपिसांच्या नाजूक रूपात
गुंफत गेली शब्द पान
तुझ्या आठवण येता मुक्त संवादात
मर्यातीची एक लक्ष्मण रेषा
जी कुणाला बांधून ठेवते
कुणाची ठरते ती भाग्यरेषा
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
========
0
4
0
9
0
1





