Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

अडत नाही

सुधाकर भुरके आर्य नगर नागपूर

0 4 8 2 8 4

अडत नाही

कुणाच्या असण्या नसण्याने,फरक काही पडत नाही…
येथे कुणाचेही कुणामुळे,मुळीच काही अडत नाही…धृ

कितीही असाल तालेवार,कितीही असाल दानशूर…
मेल्यावर रडतील थोडे,नंतर काही रडत नाही…१
येथे कुणाचेही कुणामुळे,मुळीच काही अडत नाही…

ज्यांच्यासाठी कमविले धन,उधळती ते रे क्षणोक्षण…
तुम्ही रंगविल्या स्वप्नांतले,काहीच काही घडत नाही…२
येथे कुणाचेही कुणामुळे,मुळीच काही अडत नाही…

माझे माझे करता करता,केली जीवाची राखरांगोळी…
ज्यांच्यासाठी राखून ठेवले,ते काही धडपडत नाही…३
येथे कुणाचेही कुणामुळे,मुळीच काही अडत नाही…

नको असावा गर्व धनाचा,धन असते क्षणभंगुर…
“सुधाकरा” मतलबी जगी,कुणाचे काही नडत नाही…४
येथे कुणाचेही कुणामुळे,मुळीच काही अडत नाही…

सुधाकर भुरके
आर्य नगर नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे