0
4
8
3
0
1
पापणकाठ
ओसांडून वाहू दे सखे
तुझा पापणकाठ
होऊ दे ओल्या घाटावरती
तुझी न माझी गाठ
बोल सोडून मोकळी
तुझ्या हृदयातील गाठ
समजेल कशी मजला
तुझ्या मनाची दशा अन् वाट
मनमुक्त हिंदोळ्यावर
घे तू झोक्यावर झोके
कशास मनात कुढणे
अन् कशास जाणे आडवाटे
उगाच कशाला किंतु
मनी तू बाळगते
बघ ती वसुंधरा मोहक
तुला विहारण्या खुणावते
का झुकते ही काया
खुले आकाश तुजसाठी
जन्म तुझा मुक्तांगणात
खुलून रमण्यासाठी
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
========
0
4
8
3
0
1



