प्रेरणादीप
उमरगा नगरीत दीप पेटविला,
सामाजिक कार्यांचा मार्ग दाखविला।
सांस्कृतिक रंगांनी सजली नगरी,
राजकीय वाटचालीत उमटली छाप खरी।।
बालाजी पाटील हे नाव प्रेरणेचे,
कार्यकर्तृत्व ज्यांचे समाजासाठीचे।
गोरगरिबांच्या हक्कासाठी झटणारे,
न्याय आणि सेवेसाठी नेहमी पुढे धावणारे।।
सामाजिक बंधुतेची जोपासना केली,
तरुणांना मार्गदर्शन देत वाटचाल नेली।
शिक्षण, आरोग्य, उपक्रमांचा उत्सव,
समाजहितासाठी त्यांचा सदैव प्रयास।।
गणराज मंडळाचे तेजस्वी अध्यक्ष,
ज्यांच्या नेतृत्वाखाली जनतेला विश्वास।
सांस्कृतिक कार्यक्रमांनी उमरगा रंगली,
नवनव्या उपक्रमांनी सर्वत्र उभी राहिली।।
आज त्यांच्या वाढदिवसाच्या पावन क्षणी,
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर परिवार प्रार्थना करीत आहे मनी।
आरोग्य, आनंद, कार्यशक्ती अखंड लाभो,
जीवनमार्ग यशस्वी व तेजस्वी राहो।।
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा धाराशिव
========



