
0
4
0
8
9
0
माझा मी
मी माझा बरा, माझ्यासाठी खरा, जगाचे काय?
नाव ठेवणं, खोट काढणं, त्यांचा कामच हाय!
चांगले कर्म, समजून धर्म, केले सदोदित
बोलणं खोटं, वागणं वाईट, दूर ठेवली ही रीत
फुकटची रोटी, चोरीचपाटी, जमलीच नाही कधी
सत्य बोलणं, वचन पाळणं, हीच राहिली मती..
बदलून रंग, टाकण्या भंग, नव्हे मी राजकारणी
रामाचा भक्त, मुळी ना आसक्त, करतो घामाची पेरणी
दूर सारण्या रोगा, करतो योगा शुभ प्रभाती
नम्र होऊनी, कृतज्ञ राहोनी, गातो ईश आरती
सात्विक अन्न, करतो प्राशन्न, नको उदरास भार
तंबाखू गुटखा, बिडीचा फुरका, यापासून दूर फार
अपेक्षांचा ओझा, सर्व माझा माझा, नाहीच मनी
वागतो प्रेमळ, जगतो निर्मळ, म्हणोत काही कुणी
वनिता गभणे
आसगाव भंडारा
0
4
0
8
9
0





