0
4
8
2
8
6
भ्याड हल्ला
आमने सामने लढायला
हिम्मत नाही यांच्यात
करतात भ्याड हल्ला
निष्पाप बळी जातात
राजधानीच्या शहरातच
लालकिल्ल्याच्या जवळ
घडवून तो भ्याड हल्ला
दहशतवाद करी वळवळ
अशांतता,असुरक्षितता
पसरायची असते त्यांना
दहशत निर्माण करून
विस्कळित जनजीवना
मुंबईतही 26/11 हल्ला
घडविला तो आतंक्यानी
बाजी लावली प्राणाची
लढतांना शुर सैनिकांनी
दहशतवादी छुपे हल्ले
या पूर्वी ही जेंव्हा झाले
भारतीय सैनिकांनी मात्र
तया प्रतीउत्तर ही दिले
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
8
6



