
0
5
7
4
4
8
न्याय द्या हो
न्याय द्या हो, मला विठ्ठला
माणूस आज,कसा भंगला
मायबापही अनाथाश्रमी
कुणा कशीरे,पर्वाच नाही
राजकारणी,खेळती खेळ
विसरुनी ते, स्वतःचे मुळ
मुलांना वाटे, कुटुंब चिंता
माने घटना,प्राण संहिता
लोकशाहीने, लोक जर्जर
आने कोरोणा, विषमज्वर
स्वार्थी बाटले , पुढारी बरे
कमीशनाने , सजवी घरे
पुजारी झाले , हरामखोर
देव्हाऱ्यातील , अट्टल चोर
नितिमुल्यांना , मानत नाही
सत्य जगाचे , जाणत नाही
विषमतेनी , हे वागतात
मानवतेला ,ठार मारतात
पैशासाठीच , का हापापले
कसे बेडके , डबक्यातले
न्याय कधीच, अन्यायी नाही
विठ्ठला यांना, क्षमाही नाही
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ
0
5
7
4
4
8



