कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
चितपट; मायादेवी गायकवाड
0
4
8
2
8
6
चितपट
कोणी,अगोदर खेळायचे
यासाठी, करावे लागते चितपट,
यां मुळे, रंगत येई खेळाला
मग,खेळाडू खेळतात पटापट.
स्पर्धक आणि प्रतीस्पर्धक
येतात सारे,खूपच जोशांत,
हास्याचे फवारे, हवेत उडवून
खेळात रंगत, आणतात.
माथा ठेकवून,धरतीला
धूळ भाळी, लावतात,
विजयाच्या,आशीर्वादानें
नियमानुसारच,खेळतात.
मीपणा, दूर सारून
सर्वांना समान संधी देवू,
एकीने खेळ, खेळून
प्रेम देवू, अन घेऊ.
मैत्री प्रेम,आणि राष्ट्र भक्ती
विकसित होते खेळाने,
खुन्नस मनात, न ठेवता
खेळू,बालगोपाल आनंदाने.
हार जीत, खेळात क्षणाची
तितक्या पुरतेच,त्यास ठेवू,
सहकार्य आणि बंधुभाव जपून
माणुसकी,मनात वाढवू.
जीवनाच्या, सारीपाटात
जिंको चितपट,कोणीही,
विसरावे,क्षणिक हारजीत
प्रेमाने गळाभेटी,करू आम्ही.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
8
6



