Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

गुरुपौर्णिमा

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा, ता.उमरगा जि. धाराशिव

0 5 7 4 4 8

गुरुपौर्णिमा

आई-वडील आणि सद्गुरू
हाच माझा खरा त्रिवेणी संगम
प्रथम वंदन माझ्या आई
कै. महादेवी माशाळकर यांच्या पवित्र चरणी.
द्वितीय वंदन माझे वडील
कै. गुरुलिंगप्पा माशाळकर यांच्या स्मृतीपुढे.
जन्म त्यांनी दिला, संस्कार त्यांनी दिले,
जगण्याचे बळ आणि सत्याची वाट
त्यांनीच दाखविली आणि मग…
माझ्या जीवनात उगवला ज्ञानाचा सूर्य—
परमपूज्य सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज!
सन १९८५ पासून लाभलेला त्यांचा सहवास,
आजही माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत आहे.
गुरुराया, तुम्ही देहाने दूर गेलात,
पण माझ्या अंतःकरणातून कधीच दूर गेला नाहीत.
तुम्हाला विसरणे म्हणजे
स्वतःचा श्वास विसरण्यासारखे आहे.
तुमची शिकवण, तुमची कृपा,
तुमचे प्रेम आणि आशीर्वाद—
हेच माझ्या जीवनाचे अमूल्य धन आहे.
श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान
हीच माझी कर्मभूमी, हीच माझी पुण्यभूमी.
एक सामान्य सेवक म्हणून सेवा करताना
तुमचीच प्रेरणा मला प्रत्येक क्षणी लाभत राहिली.
आज माझ्याकडे जे काही आहे,
ते माझ्या कर्तृत्वामुळे नव्हे;
ते माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने
आणि सद्गुरूंच्या असीम कृपाशक्तीनेच आहे.
गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी
माझी एकच प्रार्थना—
“हे गुरुराया…
माझ्या हातून अखंड सेवा घडू दे.
अहंकार कधीही जवळ येऊ देऊ नका.
तुमच्या चरणाशी माझे मन सदैव जोडलेले राहू दे.
शेवटचा श्वासही तुमच्या नामस्मरणात जावो,
याहून मोठे भाग्य दुसरे नाही.”
आई-वडील माझे देव,
सद्गुरू माझा श्वास.
त्यांच्या कृपेच्या सावलीतच
माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस प्रकाशमय आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सद्गुरूंची कृपाछाया सर्वांवर अखंड राहो

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा, ता.उमरगा जि. धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे