
0
4
8
2
9
0
बोलक्या भिंती
रेखाचित्रांमधून मुलांचे शिक्षण
साधनांतून फुलते निरागस मन
बालकांसाठी लक्षवेधी पर
बोलक्या भिंती ज्ञानाचे विवर
अंक, भाषा,खेळ, मनोरंजन
अमूर्त कल्पनांचे होते मंथन
भविष्यवेधी संधीचे द्वार
देती प्रतिभेला नवे आकार
विविधांगी कलात्मक आरेखन
शिकण्यासाठी मुलांचे निरीक्षण
रंगांची दुनिया नित्य आकर्षक
आविष्कार विकासवर्धक
सर्वांगीण शिक्षण एकच ध्यास
बोलक्या भिंती गुणवत्ता विकास
आशा कोवे-गेडाम
वणी जि.यवतमाळ
========
0
4
8
2
9
0



