0
4
8
2
9
0
नारीशक्ती
नऊ दिवस नऊ रात्री
नऊ रूपात नारीशक्ती
पूजा अर्चना घराघरात
घटस्थापनेने सुरु भक्ती…!!
नऊ माळी नऊ रंगाची
साडी कुलस्वामिनीला
नैवेद्य आवडीचा नित्य
अर्पण आई भवानीला…!!
आई बहीण कन्या पत्नी
नारीरूपातच आदिशक्ती
देती परिवाराला आकार
पत्नी सुचवी संसार युक्ती…!!
घरात सर्वांच्या नारीशक्ती
माया करुणा कष्ट शिकवी
ज्ञानरूपी प्रकाशाने अंधार
हरवून जीवन मार्ग दाखवी…!!
आधुनिक नारीशक्ती सुद्धा
वाटते जणू बहूभुजाधारी
अष्टावधानी अष्टपैलू नारी
म्हणून स्वर्ग नांदतो भूवरी..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
=========
0
4
8
2
9
0



