ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरबीडमराठवाडासाहित्यगंध
काव्यमहिमा
राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0
5
4
9
0
5
काव्यमहिमा
शब्दाशब्दांत दडलेला
गूढ गंध तो काव्याचा
मनाला देत राहतो तो
नित्य आनंद काव्याचा…!!
भावनांच्या लहरींना
साज छंद काव्याचा
ओळीतूनही झिरपतो
नित्य आनंद काव्याचा..!!
दुःखाच्या सावलीतून
उमटतो छंद काव्याचा
अश्रूनांही शिकवी हसू
नित्य आनंद काव्याचा…!!
वेदनांच्या राखेतूनही
उमले गंध काव्याचा
जीवनात नवी उमेद
नित्य आनंद काव्याचा..!!
विचारांना देत राहतो
मुक्त भरारी काव्याचा
अंधारात वाट दाखवी
नित्य आनंद काव्याचा..!!
काव्यमहिमा काय लिहू
श्वाससुद्धा या काव्याचा
मन शरीर हृदयाला होई
नित्य आनंद काव्याचा..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
5
4
9
0
5



