Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

जगणं सोडू नको !

सुजित वाघमारे चेरा, लातूर

0 4 8 2 9 4

जगणं सोडू नको !

निष्पर्ण झाड झाले तरी ही मुळं उखडू नको
जाईल वेळ ही पण, बस जगणं सोडू नको

शत्रू अति भयंकर चालून जरीही आला
फेकून शस्त्र आपले त्याच्या पाया पडू नको

जळल्या अनेक वस्ती वणव्यात आज येथे
तू पोळला जरासा म्हणून इतका रडू नको

आयुष्य माणसाचे एक असते सुरेल कविता
चुकले यमक थोडे म्हणून सगळं खोडू नको

निसटून दूर गेले काही धागे तुझ्या हातातून
तरी कापून नाळ आपुली तू एकटा पडू नको

जिंकशील तूच अंती हा खेळ जीवनाचा
फासेच उलटे पडले म्हणून डाव मोडू नको

जाईल वेळ ही पण…. बस जगणं सोडू नको…!

सुजित वाघमारे
चेरा, लातूर
=========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे