Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013″ या बाबत जे. एस. एम महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन.

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 3 0 3

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013″ या बाबत जे. एस. एम महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन.

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग ( दि २६): जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय व ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रति्बंधक कायदा 2013 संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत असताना प्राचार्या ॲड. निलम हजारे यांनी प्रतिपादन केले कि, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रति्बंधक कायदा 2013 यानुसार महिलांना तसेच मुलींना सन्मानाने नोकरीं करता येईल. हा कायदा महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर, विविध शैक्षणिक संस्था आणि इतर कार्यालयांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.

या कायद्याचा उद्देश: कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणे,लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समित्यांची स्थापना करणे आणि महिलांसाठी सुरक्षित आणि अनुकूल कामाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. तसेच नोकरीं किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना कायदेशीर संरक्षण व अधिकार या कायद्याअंतर्गत मिळालेले आहेत या बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्या पुढे म्हणाल्या कि, जे या प्रकरणात दोषी आढळतात त्यांना या कायद्या नुसार शिक्षा होऊ शकते. सदर कार्यशाळेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. सोनाली पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्ष आणि अंतर्गत समिती प्रमुख प्रा. वर्षा पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात महिलांनी या कायद्याचा वापर करून सक्षम व्हावे आणि आत्मनिर्भर व्हावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. नीलकंठ शेरे, उप-प्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. जयश्री पाटील मॅडम, प्रा. शिल्पा कवळे मॅडम, प्रा. संदीप घाडगे तसेच दोन्ही महाविद्यालयांचे सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि एकूण 84 विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे