
0
5
1
6
5
2
धाक तो धाक
धाक तो धाक असतो
नाहक कधीही नसतो..
संतुलित जीवनाचा तो
जणु योग्य पायाच रचतो..
पालकांच्या अतिलाडाने
मुलांमध्ये उद्धटपणा वाढतो..
पुढे वय वाढल्यावर दोघांचाही
मनाला वेगळाच धाक पडतो…
कधीकधी अती धाक ही
संसारी जीवनाला नडतो..
घराचे सारे चव्हाट्यावर घेऊन
घटस्फोटापर्यंत धाकाचा पारा चढतो..
धाक तो धाक असतो
कोणालाही दाखवता येतो..
पण हा धाकाचा विष बाण
गरीबांचे निष्कारण बळी घेतो..
पण अनुशासन आणि शिस्तीला
धाकाचेच लागते सदैव चाबूक…
अहम् सोडून संयमाने हाताळले तर
धाकात ही मायेची हाक वाटते आपसूक…
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
========
0
5
1
6
5
2



