
0
5
9
0
3
7
भगदाड
जीवनरूपी नाव माझी संकटात अडकलेली
शोधू लागली किनारा दिशा ती भरकटलेली
चहूदिशेने सुटले वारे मग तोडून शीड टाकले
गलबत नको असे बुडाया भगदाडही शोधले..
नको शिराया पाणी कोठून केली चाचपणी
भगदाडाचे असे भय ते उगाच लागले मनी..
असल्या दु:खलहरी तरी आशा एक वाटली
गाठेल कधीतरी किनारा शाबूत नाव आपुली..
दाखवून देतील दिशा मज आकाशीचे तारे
विराण माझ्या हास्याला फुटतील नवे धुमारे.
जात राहू पुढे पुढे, होते चालूच वल्हवणे
संपून जाईल अवस आता येईल हो चांदणे..
वा-याशीही केली गट्टी, जरी वाहे तो उनाड
प्रखर जिद्दीला माझ्या, न पडू दिले भगदाड..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर , जि.पुणे
=========
0
5
9
0
3
7



