
0
5
9
0
3
4
ढगाआड ‘तो’
निळ्या निळ्या आकाशात
ढगाआड तो बघा चांदोबा
पाघरूनीया आभाळ हसते
रात्रीलाच त्याचे रूप दिसते
किती दूर आहे चंद्रा तुझे घर
तुझ्या घरी मला नेशील का
तुझा मित्र आहे म्हणे ससोबा
त्याच्यासवे मला खेळू देशील का
चांदोबा चांदोबा तुझे जग किती सुंदर
तुझ्या जगात मला राहू देशील का
कधी खेळ खेळू तर कधी गोष्टी सांगू
माझा बाल संवंगडी तू होशील का
का रे तू चांदोबा दूर दूर राहतोस
निळ्या, तांबड्या छटा तू दावतोस
तुझ्या गोजिरवाण्या सुंदर रूपाने
आम्हा चिमुकल्यांना तू आनंद देतोस
फुलाफळांनी बहरलेल जग बघायला
दुडू दूडू धावत कधीतरी खाली ये ना
आमच्यासोबत लपाछपी खेळ ना
हिरव्या हिरव्या निसर्गात रमून जा ना
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
5
9
0
3
4



