आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनसाहित्यगंध
एक होती मुंगी
मृदुला कांबळे गोरेगांव, जि.रायगड

0
4
8
2
8
4
एक होती मुंगी
एक होती मुंगी
तिला लागली भूक..
डब्यात जाऊन शिरली
अन् साखर खाल्ली खूप…
एक होती मुंगी
तिला लागली तहान…
पाण्याच्या थेंबातून पाणी
प्यायली ती हलवत मान…
एक होती मुंगी
तिला वाजली थंडी…
पान,फुलांची शिवून
तिने अंगात घातली बंडी..
एक होती मुंगी
ती आली माझ्या पायात..
अंगाचे केले मुटकुळे
आणि धुम पाळली क्षणात..
एक होती मुंगी
तिला शिस्तीचे भारीच भान..
एका मागून एक चालतात
असले जरी तिचे जीव लहान..
मृदुला कांबळे
गोरेगांव, जि.रायगड
=========
0
4
8
2
8
4



