मराठीचे शिलेदार समूहाप्रती ‘ऋणनिर्देश’; बळवंत डावकरे
श्री बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड ©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार समूहाप्रती ‘ऋणनिर्देश’; बळवंत डावकरे
माणसांच्या मागे कितीही व्याप असू द्या पण आपल्यावरील जबाबदारीला संपूर्णपणे न्याय देण्याचं काम करणारी माणसंच सर्वांच्या ह्रदयात आपुलकी निर्माण करतात यातीलच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मराठी शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा राहुलभाऊ पाटील.अप्रुप वाटावं असं कार्य आहे त्यांचं.
काल सकाळी ‘तुमचा फोटो पाठवा’ हा आनंददायी संदेश वाचला व मनात उत्सुकता होती की,कोणती रचना झळकणार.कांही वेळातच त्रिवेणी प्रकारात सर्वोत्कृष्टचे पोस्टर वाचायला मिळाले आणि आनंद झाला.या प्रकाराचे लेखन करताना मनातील कल्पनांचे द्वंद्व जोरात सुरू होते व नवीन शब्दांची जुळवाजुळव करत ही रचना आकारास येते.
स्त्री म्हटलं की रुसणं, फुगणं, लाजणं, रागावणं,नजरेचा कटाक्ष मारणं, ते पाहून बिचाऱ्यांच्या आनंदाला उकळ्या फुटणं आणि तो कटाक्ष मृगजळ ठरला तर मात्र त्याच्या मनाची अवस्था केविलवाणी होणं हे सारं तिच्या नखऱ्यातून अनुभवायला मिळते.
आज माझ्या रचनेला सर्वोत्कृष्ट बहुमान प्राप्त झाला याबद्दल राहुलभाऊ, सविताताई, वनिताताई, स्वातीताई, तारकाताई, वृंदाताई, विष्णुदादा, संग्रामदादा, प्रशांत भाऊजी सर्व परीक्षक व माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करुन मनाला उभारी देणारे सर्व सन्माननीय शिलेदार यांचे मनस्वी आभार.
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



