Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सेवादल नगरात आदिवासी उडान बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 4 1 0 0

सेवादल नगरात आदिवासी उडान बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर (दि १५) :आदिवासी उडाण बहुउद्देशिय विकास संस्था नागपूर च्यावतीने 14 एप्रिल रोजी महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सेवादल नगर नागपूर, येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर गोंगपा , प्रमुख पाहुणे प्रशिलजी कोडापे, श्रीमती निलीनी ताई दडांजे उपस्थित होते. मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. गंगाताई डी. टेकाम यांनी केले व सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम! त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं आहे. त्यांचा संघर्ष आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.किर्तीताई युवनाते यांनी केले. सौ.नम्रताताई टेकाम, सौ.माधूरीताई मरकाम, सौ, वंदनाताई मरकाम, सौ.वर्षाताई परचाके, सौ.कमलताई आत्राम, सौ.अर्चनाताई कुळमते सौ. शिल्पाताई कुंभरे व तसेच समस्त बंधू आणि भगिनीं प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे