
0
6
3
0
4
9
पावन दीक्षाभूमी
अज्ञानाच्या घनगर्द तिमिरी
प्रकाशरेखा ही झळकली
अंधाराचे जाळे भेदूनी
आभा तेजाची पसरली
बाबासाहेब रुपी ज्ञानसूर्य
धरेवरी या कसा उजळला
दीनजनांच्या उध्दारकाने
शिक्षणाचा मूलमंत्र दिधला
घटनेचे शिल्पकार जाहले
न्याय शिक्षण स्वातंत्र्याचे
समानतेचे बीज मनी पेरले
उरी स्वप्न जनकल्याणाचे
परम पावन ही दीक्षाभूमी
साक्ष असे हो इतिहासाची
समतेचा सूर्य तेजाळला
जागे आशा नव्या युगाची
नागपूरच्या भूमीत घडली
महान धार्मिक ही क्रांती
बुध्दधम्म मार्ग स्वीकारून
जागविली समतेची ज्योती
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जिल्हा सांगली
=========
0
6
3
0
4
9



