कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन
जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार व पदाधिकारी यांची उपस्थिती
कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा
जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार व पदाधिकारी यांची उपस्थिती
वर्धा (दि१० जुलै) :कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देऊन नुकतीच सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या मध्ये रिक्त असलेले शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग 3 – श्रेणी 2 या पदावर पदोन्नतीने पदे भरण्यात यावे,
2)केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदी रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावे,
3) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी 3 ची पदे पदोन्नतीने रिक्त पदानुसार दरसाल भरण्यात यावे,
4) अनु जातीचे मुलींचा उपस्थिती भत्ता अदा करण्यात यावा.
5)शिक्षकांकडून blo ची कामे काढण्यात यावे
6) सेवानिवृत्त होणारे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती दिनीच gpf चा चेक, व इतर लाभ देण्यात यावा.
7) बाहेर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांचे nps ची रक्कम gpf मध्ये वर्ग करण्यात यावे
8) काही शिक्षकांचे वैद्यकीय बिले प्रलंबित ठेवले जातात असं निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावे
9) शासन परिपत्रक क्र. Bcc/प्र क्र948/12/16ब दिनांक 3 मे 2011 व दिनांक 3/3/2018 नुसार कास्ट्राईब शिक्षक संघटनेची दर तीन महिन्यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्यात यावी. आदिसह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार,आकाश पाटील, योगीराज पाटील, नितेश कालपांडे, अनिल वानखेडे, आर पी थुल आदि पदाधिकारी उपस्थित होते.



