0
4
8
2
9
3
हिशोब
वेडी मी… मला कुठे जमणार टिपून ठेवणे
सांग ना काय टिपून ठेवू…
माझ्या भावना,माझे प्रेम की माझे झुरणे
सगळे असूनही तुझ्या साठी रात्र रात्र जागणे
सांग ना… कशाचा हिशोब मांडू….
एकटिनेच ढाळलेल्या अश्रूंचे
कोणते मोल लावू
तू कसाही वागला तरी
पुन्हा तुझ्यातच रत होण्याचा
कोणता भाव मागू
सांगशील का…..
माझे तळमळने,तळतळने ,जळणे
विरहात एकटेच भाजणे
कोणत्या औषधीने भरून देशील
माझे झिडकारलेले जगणे
आहे का उत्तर……
कोणता भाव लावशील
की माझी किंमत शून्यवत
नेहमीच वजा तुझ्यातून
आठवण येईल तेव्हाची मी संगत
सांग ना…….
जमेल का मला हिशोब करणे
खरं सांग.. तुला तरी जमेल का
माझ्या भावनांना मोजणे
अन् त्यांची किंमत अदा करणे
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
0
4
8
2
9
3



