0
4
8
2
9
0
दिसेच ना…!
कावकावणारा कावळा
पोपट हिरवा हिरवा
आता कुठे दिसेच ना.!
जंगलातील तो पारवा
चिवचिवणारी चिमणी
कुहू कुहू काळा कोकिळ
आता कुठे दिसेच ना..!
खेकडा नि त्याचे बिळ
उंच उंच उडणारी घार
भला मोठा पक्षी गिधाड
आता कुठे दिसेच ना..!
भिरभिरणाऱ्या गांज्याची धाड
शंखातील गोगलगाय
डबक्यातील बेडूकराव
आता कुठे दिसेच ना..!
सोनुली,सोनपाखराचे नाव
पशू, पक्षी, प्राणी ,किडे
हे कुठे बरं गं गेले..
सांग ना गं आई मला
सर्व दिसेच ना का झाले??
वनिता गभणे
आसगाव भंडारा
======
0
4
8
2
9
0



