0
4
8
2
9
0
चला गाऊ मंगल गान
स्वातंत्र्याची पहाट होता, दिले बाबांनी संविधान
अमृत महोत्सवी वर्षात,चला गाऊ मंगल गान
सत्याग्रह केला वीरांनी, आणि भोगला कारावास
आयुष्याची करून होळी, अर्पिले अखेरचे श्वास
स्वातंत्र्याच्या होमकुंडात,केले प्राणाचे बलिदान
अमृत महोत्सवी वर्षात,चला गाऊ मंगल गाण
धर्म, पंथ जरी वेगळे,आहे सशक्त संविधान
भिन्न भाषा वेश आमचे,देशभक्ती आमचा प्राण
मुखात आहे जय हिंद,ध्वज तिरंगा अभिमान
अमृत महोत्सवी वर्षात,चला गाऊ मंगल गान
प्रगतीसाठी शोधू चला,विकासाच्या नवीन दिशा
एकीचे दाखवुनी बळ,भक्कम करू सीमा रेषा
हाती धरू ध्वज तिरंगा,गणतंत्र करू महान
अमृत महोत्सवी वर्षात,चला गाऊ मंगल गान
सीताराम नरके
पुणे
=======
0
4
8
2
9
0



