कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
थांब ना आता; शर्मिला देशमुख-घुमरे
0
4
8
2
9
4
थांब ना आता
थांब ना आता
किती रे पळतोस
कुंपणापर्यंत धाव तुझी
किती जीव जाळतोस
वेळ नाही तुला
पोटाला खाण्यासाठी
कुटुंबाला सोडून पळतोस
म्हणतोस तर कुटूंबासाठी
दुखावले मन तरी
सावरण्यास वेळ नाही
शरीराचे दुखणे तुझे
आराम तू घेत नाही
थकतील पाय जेव्हा
चालशील तू कसे
उंच भरारी घेण्यास
पंखात बळ नसे
आनंदी जगण्यासाठी
खूप काही लागत नाही
चलत चलत आनंद घे
त्याने नुकसान होत नाही
राहूनच गेले म्हणायला
काळ देत नाही वेळ
अचानक संपून जातो
हा जीवनाचा खेळ
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
==========
0
4
8
2
9
4



