Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितादेश-विदेशसाहित्यगंध

हृदयस्पर्शी

महेश पुरसों काणकोणकर कालापूर बांध तिसवाडी गोवा

0 4 8 2 9 0

हृदयस्पर्शी

मनातल्या गुपित भावनांना,
शब्दांचा नवा सेतू मिळाला,
डोळ्यांत दाटलेली अश्रूंची सर,
कवितेतूनच मोकळेपणानं ओघळला.

वाऱ्याच्या झुळुकीत आठवणी गुंफल्या,
प्रत्येक ठोक्यात तुझ्या नावाच्या छाया,
एकटेपणाच्या अंधारात तूच उजेड,
तुझ्यामुळेच आयुष्याचं मिळालं वेगळं भांडार.

तुटलेल्या मनाला दिलास दिलास,
सांत्वनाचे स्पर्श अन् प्रेमळ वास,
दुःखांच्या गर्दीत उभा राहिलास,
म्हणूनच जगणं सोन्यासारखं भास.

प्रेम म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नव्हे,
ते आहे मनाच्या स्पंदनांचं गीत खरे,
एकदा हृदयात जडलं की नातं,
ते कायम राहतं श्वासोश्वासांत.

हृदयस्पर्शी क्षण हेच तर आयुष्याचं धन,
तेच देतं माणसाला खरं समाधान,
प्रेम, विश्वास, मैत्री यांच्या संगतीनं,
जीवन होतं अनमोल कविता बनून.

महेश पुरसों काणकोणकर
कालापूर बांध तिसवाडी गोवा
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे