Breaking
ई-पेपरकवितानागपूरनांदेडमराठवाडासाहित्यगंध

शोध सुखाचा

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जि.नांदेड

0 4 8 2 9 0

शोध सुखाचा

सैरभैर झालं हे जीवन
धावतंय मृगजळामागे
पदरी पडे जेव्हा निराशा
मन मनालाच दुःख सांगे

विश्वरुप पाहताना जगाचे
स्वरुपाचा तूज विसर पडे
स्वतःमध्ये पहा डोकावून
ऐकवती अंतरीचे बोल खडे

धांद्यात मिथ्या बोलुनी का
फसवतात जनमाणसांना
कुकर्म घेऊन हे संगतीला
वाट लटके नेत्री आसवांना

सत्कर्म निखळ पाण्यावाणी
दिसावे आचार विचारातून
शोध सुखाचा घेशी जेंव्हा
पडावे प्रतिबिंब कार्यातून

अती हाव असे खडा मिठाचा
शोध सुखाचा घेण्यात फसला
नशिबी दुःखाचेच काटे पसरले
जगण्यात राम न आता उरला

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि.नांदेड

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे