0
4
8
3
0
0
भीती वाटतेय
भीती वाटतेय ग आई
घराबाहेर निघण्याची
बातम्यात पाहत होते
संकटी जान चिमुकल्यांची
आम्ही छोट्या छोट्या
सामना कसा करणार
घरातच बसून राहू का
बाहेर मोकळे कसे खेळणार
गोष्टीतले राक्षस म्हणे
बाहेर मोकाट फिरतात
लहान असो की मोठ्या
मुलींनाच ते मारतात
शाळेत जातानाही आता
छातीत धडधड होतेय
कोणाची चाहूल लागताच
जीव घाबराघुबरा होतोय
उगीच मुलगी झालो
तुम्हालाही भीती वाटते
आम्ही घरी येईपर्यंत
तुमचे काळीज खाली वर होते
आता वाटते समाजात
आमचा जन्मच होऊ नये
जगता येत नाही आम्हाला
निसर्गाने जन्म देऊ नये
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
0
4
8
3
0
0



