0
4
8
2
8
6
बघून घेऊ
अंगळ टंगळ करत-करत
बघून घेऊ म्हणत राहिलो
परीक्षा होती समोर तरी
रात्र- रात्र वेबसिरीज बघत राहिलो
पुस्तक समोर घेतलीच कदाचित
लगेच डुलकी घेत राहिलो
उद्या बघून घेईन म्हणून
पुस्तक उषाखाली ठेवत राहिलो
असे करता -करता
परीक्षा आता आली तोंडावर
पण उद्या बघून घेता आलं नाही
अन अभ्यास काही झालाच नाही
उजाडला परीक्षेचा दिवस
पेपर सोडवायला गेल्यावर
पेपर कडे टकामका बघत राहिलो
पेपर काही सुचलाच नाही
परीक्षेचा निकाल आला
रोल नंबर कुठेच दिसला नाही
आता लावला कानाला हात
अभ्यासासाठी बघून घेऊ म्हणणार नाही
सौ सुरेखा कोरे
जि.नागपूर
=======
0
4
8
2
8
6



