जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
विविध उपक्रमांचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि ३१): मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी प्रतिवर्षी दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात येतो.
यानिमित्ताने महाविद्यालयात बुधवार, दि. १४ जानेवारी ते बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा व साहित्य यावर आधारीत ग्रंथप्रदर्शन, ‘मोडी लिपीची ओळख’ या विषयावरील कार्यशाळा (मार्गदर्शक – प्रा. हर्षला महाजन), ‘मराठी भाषा आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील व्याख्यान (मार्गदर्शक – प्रा. सुरभी वाणी), ‘बाळगा मराठीचा अभिमान’ या विषयावरील भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा, ‘मराठी भाषा महत्त्व व संवर्धन’ या विषयावरील रील्स स्पर्धा, अभ्यासक्रमातील नाटक विद्यार्थ्यांना दाखविणे अशा विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व उपक्रम व स्पर्धांमध्ये मिळून एकूण ४८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. सोनाली पाटील, मराठी विभागप्रमुख डाॅ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. सुरभी वाणी, प्रा. हर्षला महाजन यांनी या कार्यक्रमांचे व सर्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.



