
0
4
0
9
0
3
विसर्जन
मनातील विकारांचे
नकारात्मक विचारांचे
करू या की विसर्जन
मनातल्या द्वेष मस्तराचे
जुने जिर्ण झालेली वसने
करून त्याचे पोतेरे
झाडून सारवून लख्ख
अंगणी रांगोळीचे चित्र न्यारे
झाले गेले विसरून जावू
नवीन गाणे नव्याने गाऊ
मनामनाने जोडू भारत
आपण सारे एकोप्याने राहू
वरच्या फळीवर कधीपासून
हात पोहोचला नाही कधी
चिकट तळणाच्या डागाने
चिकटली धूळ अधीमधी
फिरता हात गृहीणीचा
लख्ख होते घर सारे
कणाकणातून वाहतसे
प्रसन्नतेचे तेजल वारे
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
0
4
0
9
0
3





