
0
4
0
9
0
3
एक मात्रा
एक मात्रा
भलतीच गुणी
सारेच चुकते
विसरता कुणी
‘केळ’ चुकून होते ‘कळ’
‘वेळ’ चुकते उठतो ‘वळ’
‘खेळ’ चुकतो राहतो ‘खळ’
‘मेळ’ नसता उरतो ‘मळ’
‘वेणी’ तले फूल ‘वणी’ त जाते
‘वेश’ कुणाचा ‘वश’ होते
‘नेम’ चुकूनी मग ‘नम’ ते
‘देशा’ ची मग ‘दशा’च होते
‘वारे’ उडून ‘वार’ होतात
‘नारे’ कुठे ‘नार’ होतात
‘सारे’ जाऊन ‘सार’उरतात
‘तारे’ गळून ‘तार’ उरतात
अशा चुका
करू नका
एक मात्रा
विसरू नका….
स्वाती लभाने
ता. जिल्हा वर्धा
========
0
4
0
9
0
3





