
0
4
0
9
0
3
विच्छेदन
आत्म्यासह सचेतन देहास
नाजूक त्वचेचे आच्छादन
चलनवलन स्तब्ध होताच
मग होते शवाचे विच्छेदन… //
देहाची राख होण्यापूर्वी
अवयव दानाचा संकल्प
मरूनही मागे उरण्याचा
एकमेव अद्भूत विकल्प… //
विज्ञान हेच खरे वरदान
आता सर्वार्थाने जाणावे
येथे मरणोत्तर देहदानाचे
महत्त्व सर्वांनी जाणावे… //
एखाद्या अपघात ग्रस्ताचे
पुन्हा बहरू शकते आयुष्य
अवयव प्रत्यारोपण करून
सावरू शकते उभे भविष्य… //
विझलेल्या नेत्रज्योती पुन्हा
प्रज्वलित होतील येता दृष्टी
या नयन रुपाने मागे उरून
पुन्हा पहावी ही सुंदर सृष्टी… //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
====
0
4
0
9
0
3





