
0
4
0
9
0
3
सुसंवाद नात्यात
स्वरात लपलेल्या प्रश्नांचे आज
उत्तर कोणालाच कसे मिळेना?
समजदारी ओसरत चालली
सुसंवाद नात्यात कसा जुळेना…??
व्यक्ती कोणतीच नसते वाईट
फक्त विचाराची पद्धत कळेना..
कधी आपले कधी दुसऱ्याचे
सुरात सूर दोन्ही मिसळू द्या ना..!!
दोन सूर साधतील लय ताल
ऐकून तर कळेलच दोघांना…
शब्दसूर असे द्यावे इतरांना
घेताना होईलच आनंद मना…!!
सुरात सूर मिसळून जीवन
आपले सुखकरच होईल ना…
उद्देश सफल जीवनाचा आणि
विधाता खूश पाहून स्वरांगणा…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता.जिल्हा बीड
=======
0
4
0
9
0
3





