अलिबागआरोग्य व शिक्षणकविताकोकणक्रिडा व मनोरंजनसाहित्यगंध
खुराडयातून
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे श्रीवर्धन जि. रायगड
0
4
8
3
0
0
खुराडयातून
गणू, बाबू, छोटा चिंटू
चला आजी आजोबाला भेटू
बाबांनी काढली गाडी
आली बघा मामाची वाडी!!१!!
आजी म्हणाली खायला काय करायचं
आम्हा मुलांना तर ऑमलेट बनवायचं
आज्जी म्हणाली कोंबडी रावणावर
ताव मारा आता वरणभातवर !!२!!
आमच्या तोंडचा चंबू झाला
आम्ही म्हणलो खेळायला चला
पावसाचे दिवस धो धो पाऊस
तरीही आम्हाला भिजायची हाऊस!!३!!
भिजून झाले कपडे ओले
तरीही आमचा खेळ चाले
मामानी आवाज दिला
या पोरांनो पडावीत चला!!३!!
दमून भागून झोपलो मस्त
सकाळी मस्तक झालं सुस्त
जांभळी देऊन खुराड्याजवळ बसलो
पिलांचा आवाज ऐकून गोड हसलो!!४!!
इवल्याशा पिलांना बघून
जीव गेला हरखुन
आजीचे म्हणणे आता पटले
अंड्यातून छोटाले पिल्ल बाहेर पडले!!५!!
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
0
4
8
3
0
0



