
0
5
2
4
6
6
प्रीत
स्वप्नातही तुझ्याच, प्रित रंगांची दरवळ आहे,
मनफुलीच्या पाकळ्यांना, तुझीच हिरवळ आहे…
चांदण्यांनीही विचारावे, अशी ही तुझी छाया,
रात्रभर जागवणारी, तुझी गूढ प्रीत माया …
ओंजळीत साठवावी, तरीही न मावे अशी,
अमर्याद सागराची, धीर गंभीर खोली जशी …
उजेडातही तूच, अंधारात तुझाच भास
अवतीभवती जाणवतो, नित्य तुझा सहवास..
हरपूनही सापडावी, अशी ही तुझी चाहूल,
स्मृती पटलावरती, उमटतात तुझे पाऊल..
मनाच्या काव्यातल्या, हर ओळीतला तू शब्द ,
माझी हर कविताही, होतेय तुझ्यावरच लुब्ध..
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
0
5
2
4
6
6



