गर्जा महाराष्ट्र माझा..!!
कार्तिक झेंडे पाटील ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

गर्जा महाराष्ट्र माझा..!!
संतांची परंपरा, छत्रपती शिवरायांचे शौर्य, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आणि शेतकरी कष्टकऱ्यांची भूमी असलेला हा महाराष्ट्र. देशासह जगाला लढण्याच्या आणि क्रांतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्र. ही भूमी केवळ इतिहासाने महान नाही, तर संस्कृती, साहित्य, कला आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांनीही समृद्ध आहे.
१ मे हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत, एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प आपण या दिवशी करूया. “गर्जा महाराष्ट्र माझा” ही केवळ घोषणा नसून प्रत्येक मराठी मनातील अस्मिता आहे. आपल्या मातृभूमीचा सन्मान, संस्कृतीचे जतन आणि समाजहिताची भावना कायम ठेवणे हीच खरी महाराष्ट्र दिनाची प्रेरणा ठरो.
जय महाराष्ट्र!
कार्तिक झेंडे पाटील
ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर
=====



